• छापा
 • मागे

  नावीन्यपूर्ण उपक्रम

  आयएसओ ९००१:२०००

  नाशिक जिल्हा परिषदेस आयएसओ ९००१:२००० हे मानांकन प्राप्त असून दैनंदिन कामकाजात सातत्याने सुधारणा होण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातात.

  नाशिक जिल्हा परिषद - विविध उपक्रमांची माहिती

  सर्व शिक्षा अभियान

  सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात नवीन प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या व वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात आले.

  सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कदमवस्ती येथे सन २००९-१० बांधण्यात आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुंदर इमारत. कदमवस्ती जवळ प्राथमिक शाळा नसल्याने गावकर्यांच्या आग्रहातून ही शाळा बांधण्यात आली.

  सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात सरदवाडी येथे सन २००९-१० मध्ये बांधण्यात आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुंदर इमारत. सरदवाडी येथे जवळ प्राथमिक शाळा नसल्याने गावकर्यांच्या आग्रहातून ही शाळा बांधण्यात आली.

  जिल्हा परिषद नाशिकमार्फत सुरू असलेल्या ईगतपूरी तालुक्यातील घोटी येथील कस्तुरबा गांधी विद्यालयातील विद्यार्थीनींचा शैक्षणिक परिपाठ सुरू असतांना.

  अंगणवाडी केंद्र

  ४ लक्ष रुपयात परवडत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था तसेच नोंदणीकृत कंत्राटदार यांचेकडून प्रत्येक वेळेस कामवाटप समितीवर या अंगणवाडी बांधकामांना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अशावेळी शासनाचा कोट्यावधी निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली होती. यानंतर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता इवद यांनी प्रयत्नपूर्वक या अंगणवाडी केंद्र बांधकामासाठी शोध मोहिम हाती घेतली व प्रायोगिक तत्वावर नाशिक तालुक्यातील विल्होळी येथे एक प्री-फॅब्रीकेशन तंत्राज्ञानाचा वापर करून एका सुंदर अंगणवाडी इमारतीचे बांधकाम केले. याच तंत्रज्ञानाचा वापर करून नाशिक जिल्ह्यातील एकूण ६०० अंगणवाड्या बांधकामाचा विचार सुरू आहे.

  विल्होळी येथील अंगणवाडी केंद्र

  वृक्षलागवड

  १०० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी २१.५४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंतर्गत रोपवाटीका तयार करणेबाबत शासनाच्या सुचना आहेत. याच अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कोनांबे ग्रामपंचायत मार्फत १.०० लक्ष रोपे उगवण करण्याची क्षमता असलेली रोपवाटीका तयार करण्यात आली आहे. यात चिच, काशिद, करंज, गुलमोहर, आवळा, सिताफळ, शिरस व विलायती चिच इ.रोपांची लागवड करण्यात आली आहे.

  सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप

  दरेगांव (कोकणदरा) ता.मालेगांव येथील वस्तीवर विद्यूत पुरवठा नसल्याने, वस्तीपासून जवळपास १५० मिटर अंतरावर एकच हातपंप होता. सदर हातपंपाची क्षमता चाचणी योग्य आल्याने सदर ठिकाणी सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना घेणेत आली. सदर विधण विहिरीवर १ एच पी सौर उर्जेवर चालणारा सबमर्शीबल पंप व हातपंपाची उभारणी करणेत आली व जनतेस नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. सदर वस्तीवर दोन ठिकाणी स्टँडपोस्ट घेणेत आले असून, सदर वस्तीवर पाणी पुरवठा होत असून आजतगायत सदर योजना सुरळीत चालू आहे. भविष्यात अशा योजना योग्य साईट्स उपलब्ध झाल्यास घेण्याचा मानस आहे.

  प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहाडी, ता.दिडोरी, जि.नाशिक

  नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक नावाजलेले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून मोहाडी केंद्राचे नाव घ्यावे लागेल. सतत दोन वर्षे डॉ.आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार या आरोग्य केंद्राने पटकावला आहे. येथे अत्याधुनिक संगणक कक्ष उभारण्यात आले असून यात ३ संगणक संच आहेत. सर्व संगणक इंटरनेटद्वारे जोडण्यात आले आहेत. मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जैविक कचर्या३ची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावण्यात येते. या केंद्रात आयईसी मटेरियल अत्यंत सुरेख पध्दतीने प्रदर्शित केले आहे. दैनंदिन ओपीडी १०० असून शहरातूनही काही रुग्ण येथे उपचार घेण्यास इच्छूक असतात. या आरोग्य केंद्रात लोकसहभागातून ५०० वृक्षांची लागवड केली असून सर्व झाडे जगली आहेत. तसेच लोकसहभागातून दूरदर्शन संच, डिश टीव्ही रिसीव्हर, अॅक्वागार्ड, पीसीओ (दूरध्वनी) इ.साहित्य मिळाले आहे. सदर आरोग्य केंद्रास भेट दिल्यास आपण एखाद्या सुसज्ज अशा खाजगी रुग्णालयास भेट देत आहोत असे वाटत.

  प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहाडी

  पशुसंवर्धन विभागाच्या कामधेनु योजनेचे उदघाटन

  मौजे उत्राणे ता.सटाणा येथे कामधेनू योजने अंतर्गत शिबीर घेण्यात आले असून सदर शिबीरात ५८९ जनावरांवर औषधोपचार करण्यात आले. ६४ जनावरांची वंधत्व तपासणी करण्यात आली, ७२१ जनावरांवर गोचिड निर्मूलन फवारणी करण्यात आली. यामुळे गावातील जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढ होण्यास मदत झाली. अशी शिबिरे नियमितपणे घेण्यात यावी अशी प्रतिक्रिया गावकर्‍यांनी व्यक्त केली.

  बायोमेट्रीक प्रणाली

  कर्मचार्‍यांनी का कार्यालयीन वेळेत कामावर हजर राहण्यासाठी जिल्हा परिषद नाशिक मुख्यालय येथे दोन ठिकाणी बायोमेट्रीक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांना त्यांच्या उजव्या/डाव्या हाताची तर्जनीद्वारे दैनंदिन हजेरी नोंदवून घ्यावी लागते. कर्मचार्‍यांच्या येण्याची व जाण्याच्या वेळेची नोंद या प्रणालीद्वारे होते.

   

  सीसीटीव्ही कॅमेरे

  जिल्हा परिषदेतील शिक्षण व आरोग्य हे विभाग मोठे व महत्त्वाचे असल्याने येथील कामकाजावर नियंत्रण असणे आवश्यक असते. यामुळे शिक्षण व आरोग्य विभागात सध्या प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली अंमलात आणली आहे. या कॅमेरांचे थेट प्रक्षेपण मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांच्या दालनातील संगणकावर होते.

  प्रलंबित नस्त्यांचा निपटारा

  मा.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग नाशिक यांचेकडेस प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांना त्यांचे विभागात प्रलंबित असलेल्या नस्त्यांची यादी सादर करावी लागते. यामुळे नस्त्या प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी झाले असून नस्त्यांचा निपटारा लवकर होण्यासाठी मदत झाली आहे.

  नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना :

  दुधाळ संकरीत गाई/म्हशींचे वाटप करणे

  जिल्हयात दुग्ध व्यवसायाची जोड दिल्यास शेतकर्यांठना दुग्ध व्यवसायाव्दारे वर्षभर खात्रीशीर व सातत्यपुर्ण उत्पन्न मिळेल. तसेच जिल्हयात दुध उत्पादनात वाढ होवून ग्रामीण भागात स्वयंरोजगार देखील निर्माण होईल या करीता जिल्हयात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी सहा संकरीत गाई/म्हशींचे गट वाटप करणे, या राज्यस्तरीय नाविन्यपुर्ण योजनेस मंजूरी मिळालेली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना ६ दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करतांना ५० टक्के अनुदान तर अनुसुचित जाती/जमातीच्या लाभार्थींना ७५ टक्के शासकिय अनुदान अनुज्ञेय राहील. खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना अनुदानाव्यतीरीक्त उवैरीत ५० टक्के रक्कम स्वतः अथवा बँक/ वित्तीय संस्थेकडून कर्ज घेवून उभारावी लागेल. बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणार्‍यास (खुल्या प्रवर्गातील १० टक्के लाभार्थी हिस्सा व ४० टक्के बँकेचे कर्ज व अनुसुचित जाती/जमातीसाठी ५ टकके लाभार्थी हिस्सा व २० टक्के बँकेचे कर्ज) लाभार्थींना या योजने अंतर्गत प्राधान्य देण्यात यावे.

  शेळी गट वाटप

  राज्यात अशंतः ठाणबंद पध्दतीने शेळी पालनाव्दारे शेतकर्‍यांना पुरक उत्पन्न मिळवून देणे या विशेष राज्यस्तरीय योजनेअंतर्गत योजनेस (सर्वसाधारण/अनुसुचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजने अंतर्गत) या व्दारे शासनाची प्रशासकिय मंजूरी प्रदान केलेली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्याना उस्मानाबादी /संगमनेरी जातीच्या अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातीच्या पैदासक्षम १० शेळया व १ बोकड या प्रमाणे एका गटाचा वाटप केला जातो. या योजने अंतर्गत खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान देण्यात येईल. अनुसुचित जाती/जमाती प्रवर्गातील लाभाथ्यांसाठी ७५ टक्के अनुदान अनुज्ञेय राहील.

  कुक्कुट पक्षी पालन

  जिल्हयात कंत्राटी पध्दतीने मांसल पक्षी पालन व्यवसाय सुरु करणे या नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत योजनेस (सर्वसाधारण /अनुसुचित जाती उपयोजना /आदिवासी उपयोजने अंतर्गत ) याव्दारे शासनाची प्रशासकिय मंजुर प्रदान करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के या मर्यादेत तर अनुसुचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या ७५ % मर्यादेपर्यंत शासकिय अनुदान देय राहील. प्रकल्पासाठी अनुदाना व्यतीरीक्त उवैरीत रक्कम लाभार्थीने स्वतः अथवा बक/वित्तीय संस्थेकडुन कर्ज घेवून उभारावी लागेल. बँक/ वित्तीय संस्थेकडुन कर्ज घेणार्यात सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी किमान १० टक्के स्वहीस्सा व उर्वरीत ४० टक्के बँकेचे कर्ज त्याचप्रमाणे अनुसुचित जाती/जमाती लाभार्थ्यांसाठी किमान ५ टक्के स्वहिस्सा व उर्वरीत २० टक्के बँकेचे कर्ज या प्रमाणे रक्कम लार्भार्थ्यांनी उभारावयाची आहे.