• छापा
 • सामान्य प्रशासन विभाग

  प्रशासकीय
  समिती

  सामान्य प्रशासन विभाग

  सर्वसाधारण माहिती
  ZP Nashik building

  सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनातील महत्त्वाचा विभाग आहे. जिल्हा परिषदेतील सर्व विभागांना आस्थापनात्मक मुद्दे, प्रकरणे इ.वर मार्गदर्शन सामान्य प्रशासन विभागामार्फत दिले जाते व सर्व विभागांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवले जाते. उप मुख्य कार्यकारी अधिकारी हे या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कामकाज पाहतात. या विभागाचे कामकाज पूढील प्रमाणे-

  एकूण पंचायत समित्या - १५

  नाशिक, बागलाण, चांदवड, देवळा, दिडोरी, ईगतपूरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व येवला.

  एकूण ग्रामपंचायती संख्या - १३८२

  आस्थापनात्मक

  • महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-१ व वर्ग २ अधिकारी यांची आस्थापना. तसेच म.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशाने खातेप्रमुखांची आपना सामान्य प्रशासन विभागाकडे आहे.
  • कक्ष अधिकारी/कार्यालयीन अधिक्षक/वि.अ.सां. सहा.सांख्यिकी यांची आस्थापना. तसेच कार्यालयीन आस्थापना/स्पर्धा परिक्षा घेणे/सेवा प्रवेशोत्तर परिक्षा घेणे.
  • लघुलेखक/ वरिष्ठ सहायक/कनिष्ठ सहायक यांची आस्थापना/अनुशेषाची माहिती.
  • वर्ग-४ कर्मचारी-परिचर कर्मचार्‍यांची आस्थापना व वाहन चालक यांची आस्थापना.
  • अनुकंपा प्रकरणे.
  • पदोन्नती -
   जिल्हा परिषदेकडे कार्यरत असणार्‍या कनिष्ठ कर्मचार्‍यांना शासनाच्या तरतूदींनुसार वरिष्ठ पदावर पदोन्नती पद असेल तेथे पदोन्नती देणे.
  • खातेनिहाय चौकशी -
   (कर्मचारी कार्यरत असतांना त्यांचेकडे सुपूर्द केलेल्या कामामध्ये अनियमीतता, गैरव्यवहार वा अपहार यासारख्या गंभीर स्वरूपाच्या घटना गुन्हे घडतात अशावेळी त्याची पुनरावृत्ती होवू नये व प्रतिबंध बसावा आणि त्यातील सत्य-असत्यता पडताळून जबाबदारी निश्चित करणे व दोषी आढळलेल्या कर्मचार्‍यांना गुन्ह्याच्या गांभिर्यानुसार शासनाच्या तरतूदींनूसार शिक्षा निश्चित करणे).
  • नियतकालिक बदल्या -
   शासनाच्या सुचनांप्रमाणे नियतकालिक बदल्या वर्षातून एकदाच सर्वसाधारणपणे माहे एप्रिल ते मे मध्ये केल्या जातात. बदलीपात्र कर्मचार्‍यांच्या १०टक्के इतक्या बदल्या करता येतात. त्यानुसार सेवाज्येष्ठता यादीप्रमाणे कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे कामकाज पाहणे व इतर विभागांना बदल्यांबाबत मार्गदर्शन करणे.
  • पदभरती -
   वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील पदे भरतांना शासनाने विहित केलेल्या तरतूदींनुसार कार्यवाही करणे व जिल्हा परिषदेच्या इतर विभागांना मार्गदर्शन करणे.

  नोंदणी शाखा

  जिल्हा परिषदेकडे म्हणजेच मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे येणारे सर्व शासन संदर्भ, विभागीय आयुक्तांकडील संदर्भ, अन्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांकडील संदर्भ, मा.लोक आयुक्त, प्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार इ., पंचायत समित्या, ग्रामपंचायती व सर्वसामान्य नागरीक यांचेकडून प्राप्त होणारे सर्व पत्रव्यवहार या शाखेकडे स्वीकारून एकत्र केले जातात.

  ते संदर्भ उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांचेमार्फत अति. मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे अवलोकनार्थ सादर केले जातात व अवलोकन होऊन आलेनंतर परत नोंदणी शाखेकडे आल्यानंतर त्याचे वर्गीकरण करून, संदर्भांची नोंद करून संबंधीत खातेप्रमुखांकडे कार्यवाहीसाठी पाठविले जातात. या व्यतिरीक्त मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी-सा.प्र. यांचेकडे इतर विभागातून व पंचायत समित्यांकडून येणार्‍या सर्व नस्त्यांची नोंद नोंदणी शाखेत ठेवली जाते.

  सभांचे कामकाज

  ZP Nashik building ZP Nashik building
  • सर्वसाधारण सभा

   जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा दर तीन महिन्यातून एकदा घेणेची तरतूद आहे. तथापि, मा.ना.अध्यक्ष, जिल्हा परिषद यांचे सूचने प्रमाणे कितीहीवेळा ही सभा घेता येऊ शकते. या सभेच्या कामकाजात सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समित्यांचे सभापती सहभाग घेतात. सामान्य प्रशासन विभागाच्या परिषद संकलनामार्फत या सभेचे आयोजन करण्यात येते. सर्वसाधारण सभेसाठी विषय पत्रिका नोटीस सभेपूर्वी १७ दिवस व विशेष सभेची नोटीस १२ दिवस अगोदर पाठविली जाते. सभेचे इतिवृत्त घेवून मा.ना.अध्यक्ष, जि.प. यांचे मान्यतेने अंतिम करून सर्व सन्माननीय सदस्य व सर्व कार्यालय प्रमुख जिल्हा परिषद यांना पाठविले जाते.

  • स्थायी समिती सभा

   स्थायी समिती सभा दरमहा घेणेची तरतूद आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या परिषद संकलनामार्फत या सभेचे आयोजन करण्यात येते. सभेचे इतिवृत्त घेवून मा.ना.अध्यक्ष, जि.प. यांचे मान्यतेने अंतिम करून सर्व सन्माननीय स्थायी समिती सदस्य व सर्व कार्यालय प्रमुख जिल्हा परिषद यांना पाठविले जाते.

  • समन्वय सभा

   मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा परिषदेकडील सर्व खातेप्रमुख, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका वैद्य अधिकारी, उप अभियंता यांची दरमहा समन्वय सभा आयोजित केली जाते. या सभेत जिल्हा परिषदेमार्फत राबविणेत असलेल्या विविध योजना व विकास कामे, प्रलंबित प्रकरणे इत्यादींचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले जाते. सामान्य प्रशासन विभागाच्या नियोजन संकलनामार्फत या सभेचे आयोजन करण्यात येते.

  माहितीचा अधिकार कायदा २००५ अंमलबजावणी

  शासकीय कारभारात प्रशासन यंत्रणेत पादर्शकता असणे आवश्यक आहे. माहितीचा अधिकार याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमान्वये मिळवता येण्याजोगी माहिती मिळविण्याचा अधिकार असा आहे.

  त्यामध्ये- एखादे काम दस्तऐवज, अभिलेख यांची माहिती करणे, दस्तऐवजाच्या किवा अभिलेखांच्या टिपण्या, उतारे किवा प्रमाणीत प्रती घेणे, सामग्रीचे प्रमाणीत नमुने घेणे, इलेक्ट्राॅनिक प्रकारातील माहिती मिळविणे इ. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) हे शासकीय माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहतात. तर अपिलीय अधिकारी म्हणून अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे कामकाज पाहतात. सामान्य प्रशासन विभागातील माहितीसेल या संकलनामार्फत हे कामकाज पाहिले जाते.

  भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय बीले

  जिल्हा परिषद नाशिक अधिनस्त आस्था२-अर्थ या संकलनाकडून जिल्ह्यातील सर्व विभाग व तालुका स्तरावरून या विभागाकडे भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय बीले इ.प्रकरणे प्राप्त झालेनंतर या प्रस्तावांची छाननी झालेनंतर मंजूरी दिली जाते.

  खातेप्रमुख व पंचायत समिती कार्यालयांची तपासणी

  मा.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग नाशिक यांचेमार्फत जिल्हा परिषदेची वार्षिक तपासणी करणेत येते. तसेच पंचायत समित्यांची तपासणी सामान्य प्रशासन विभागातील तपासणी संकलनामार्फत केली जाते. यात आस्थापना विषयक बाबींचे कामकाज विहित कालावधीत किवा नमुन्यात होत आहे किवा नाही हे पाहून त्यांना कामकाजामध्ये असणार्‍या त्रुटींची पूर्तता करून घेतली जाते. सदर त्रुटींबाबतचे मार्गदर्शन म.मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) हे करतात.

  नावीन्यपूर्ण उपक्रम

  आयएसओ ९००१:२०००

  नाशिक जिल्हा परिषदेस आयएसओ ९००१:२००० हे मानांकन प्राप्त असून दैनंदिन कामकाजात सातत्याने सुधारणा होण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातात.

  भरारी पथके

  शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजना प्रभावीपणे व परिणामकारकरीत्या राबविल्या गेल्या आहेत वा नाही तसेच येणार्‍या अडीअडचणी सोडविण्याकरीता जि.प. नाशिक अंतर्गत तालुका स्तरावरील पंचायत समिती कार्यालये, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपविभाग इ. ठिकाणी अचानक भेटी दिल्या जातात व पाहणी केली जाते.

  शासन आपल्या दारी

  या उपक्रमाअंतर्गत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) यांचेसह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख महिन्यातून एकदा जिल्ह्यातील कोणत्याही एका तालुक्यात मुक्कामी दौर्‍याचे आयोजन केले जाते व प्रत्येक खातेप्रमुखास एका गावाची जबाबदारी दिली जाते. त्याअनुषंगाने ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.

  बायोमेट्रीक प्रणाली

  बायोमेट्रीक प्रणाली

  कर्मचार्‍यांनी कार्यालयीन वेळेत कामावर हजर राहण्यासाठी एप्रिल २०११ पासून जिल्हा परिषद नाशिक येथे बायोमेट्रीक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांना त्यांच्या उजव्या/डाव्या हाताची तर्जनीद्वारे दैनंदिन हजेरी नोंदवून घ्यावी लागते. कर्मचार्‍याच्या येण्या व जाण्याच्या वेळेची नोंद या प्रणालीद्वारे होते.

  सीसीटीव्ही कॅमेरे

  सीसीटीव्ही कॅमेरे

  जिल्हा परिषदेतील शिक्षण व आरोग्य हे विभाग मोठे व महत्त्वाचे असल्याने येथील कामकाजावर नियंत्रण असणे आवश्यक असल्याने शिक्षण व आरोग्य विभागात सध्या सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली अंमलात आणली आहे. या कॅमेरांचे थेट प्रक्षेपण मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांच्या दालनातील संगणकावर होते.

  सेवानिवृत्ती वेतनाचे लाभ

  जिल्हा परिषदेतील जे कर्मचारी सेवानिवृत्त होतात, अशा कर्मचार्‍यांना त्यांच्या सेवेच्या शेवटच्या दिवशी सेवानिवृत्ती वेतनाचे सर्व लाभ मिळावे यादृष्टीने सामान्य प्रशासन विभागातर्फे विशेष प्रयत्न केले जातात व या कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीचे सर्व लाभ देण्याची कार्यवाही केली जाते.

  फाईल ट्रॅकिग प्रणाली

  या प्रणालीद्वारे प्रत्येक नस्तीवर एका विशिष्ट प्रकारे बार कोडींग केली जाणार असून या प्रणालीमुळे एखादी नस्ती कोणत्या विभागाकडे आहे याबाबतचे अचूक निदान होणार आहे.

  ईएपीबीएक्स प्रणाली

  प्रभावी संपर्कासाठी जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभाग या प्रणालीद्वारे दूरध्वनीने जोडले गेले आहे

  महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( जिल्हा सेवा ) सेवाप्रवेशोत्तर परिक्षा

  महाराष्ट्र जिल्हा परिषदा (जिल्हा सेवा) सेवाप्रवेशोत्तर परिक्षा नियमावली १९८५ असे संबोधण्यात येते. शासनाचे ग्रामविकास विभागाचे राजपत्र २० जानेवारी १९८६ पासून ही नियमावली अंमलात आलेली असून या दिनांकापासून नियत दिनांक म्हणजे नियमावली अंमलात येण्याचा दिनांक आहे. या नियमातील नियम तिन नुसार परिक्षा उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नियम चार मध्ये परिक्षा उत्तीर्ण होण्याचा कालावधी चार वर्षात तिन संधीमध्ये परिषद कर्मचारी सेवाप्रवेशोत्तर परिक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.

  अन्यथा नियम पाच मध्ये परिक्षा उत्तीर्ण न होण्याचे परिणाम परिषद कर्मचारी यांना लागू होतील त्यात प्रामुख्याने परिषद कर्मचारी धारण करित असलेल्या पदावर कायम करता येणार नाही व धारण करित असलेल्या पदाच्या वेतनश्रेणीत पुढिल वेतनवाढ दिली जाणार नाही.नियम ६ अन्वये नियत दिनांकास परिषद कर्मचारी वयाची ४५ वर्ष पूर्ण झालेली असतील त्यादिनांकापासून परिषद कर्मचारी यांना परिक्षा उत्तीर्ण होणे पासून सुट देता येईल.

  महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा सेवाप्रवेशोत्तर परिक्षा १९८५ मध्ये नुसार महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक सेप्रआ/११९४/सीआर.१५१२ दिनांक २४ मे १९९९ त्यात नियम ३. मुख्य नियमांच्या नियम ५ मधील सध्याच्या उपनियम (३) ऐवजी पुढील उपनियम दाखल करण्यांत यावा असे आदेशातील केलेले आहे (३) परिषद कर्मचारी नियम ४ मध्ये विहित केलेल्या कालावधीमध्ये व संधीमध्ये परिक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्याच्या आधी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या त्या पदाच्या संवर्गातील सर्व परिषद कर्मचा-याबरोबरची त्याची जेष्ठता त्याला गमवावी लागेल.आणि अशा ज्या परिषद कर्मचा-यानंतरचा ज्येष्ठताक्रम त्याला देण्यात येईल त्या परिषद कर्मचा-यांना जेष्ठ असणारे आणि त्यांच्यानंतर परंतु नियम ४ मध्ये विहित केलेल्या कालावधीमध्ये व संधीमध्ये परिक्षा उत्तीर्ण होणारे कर्मचारी त्याला जेष्ठ असतील असे स्पष्ट नमूद केलेले आहे.

  त्यानुसार महाराष्ट्र जिल्हा सेवा प्रवेशोत्तर परिक्षा १९८८ पासून घेण्यात येत असून फक्त १९८९ या वर्षी परिक्षा झालेली नाही. सदर अपवाद वगळजा दरवर्षी परिषद कर्मचारी यांचे सेवाप्रवेशोत्तर परिक्षा डिसेंबर महिण्याचा चौथा शनिवार व रविवार या दोन दिवस तिन पेपर मा.विभागीय आयुक्त नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असतात. सदर परिक्षेचा निकाल माहे जून / जुलै महिण्यात निकाल जाहीर करण्यात येतो.

  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  जिल्हा परिषद मुख्यालयातील खाते प्रमुखांना भेटावयास येणारे गटस्तरावरील कर्मचारी यांचे बाबत २०/०७/२०१८ २८२
  वरिष्ठ सहाय्यक लिपिक व कनिष्ठ सहाय्यक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे मराठी व इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्राबाबत १८/०६/२०१८ ८८६
  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे अधिकाराचे प्रत्यायोजन बाबत. (वर्ग-1 व वर्ग-2 यांचे सर्व प्रकारच्या रजा मंजुरी बाबत) ०५/०६/२०१८ १८४
  मध्यवर्ती ई-निविदा कक्ष (e-tender cell) नियंत्रण समिती २२/०५/२०१८ ९७७
  मध्यवर्ती ई-निविदा कक्ष (e-tender cell) २२/०५/२०१८ २८१
  सनियंत्रण अधिकारी व तालुका संपर्क अधिकारी म्हणून नेमणुकी बाबत १६/०४/२०१८ ७०८
  N.P.Wani BDO Charge Babat ०३/०३/२०१८ ३०६
  श्री. राजेंद्र देसले, सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती, देवळा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन कामकाज पाहणे बाबत २६/०३/२०१८ १८२
  श्री.जितेंद्र राजेंद्र देवरे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती बागलाण यांचा परिक्षेच्या अध्यायना करिता रजेचा अर्ज दि.२०/३/२०१८ २३/०३/२०१८ २६९
  श्रीम. लता अशोक जोपळे,कनिष्ठ सहाय्यक लिपिक यांचा स्वेच्छा सेवा निवृत्ती आदेश ३१/०१/२०१८ ४४१
  वकील पॅनल नेमणूक आदेश २४/०१/२०१८ १८२
  वाहन चालक आश्वासित प्रगती योजना पहिला लाभ(१२ वर्ष) मंजूर करणे बाबत १०/०१/२०१८ १५५५
  वाहन चालक आश्वासित प्रगती योजना दुसरा लाभ(२४ वर्ष) मंजूर करणे बाबत १०/०१/२०१८ १४८७
  विस्तार अधिकारी सांख्यिकी आश्वासित प्रगती योजना पहिला लाभ(१२ वर्ष) मंजूर करणे बाबत १०/०१/२०१८ १०८५
  वरिष्ठ सहाय्यक लिपिक आश्वासित प्रगती योजना पहिला लाभ(१२ वर्ष) मंजूर करणे बाबत १०/०१/२०१८ १६६६
  जिल्हा परिषद नाशिक वकील पॅनल सॅन २०१८, मा. औद्योगिक आणि मा. उच्च न्यायालय ०९/०१/२०१८ ४०८
  श्री राजगुरू कार्यकारी अभियंता इ व द क्र ३ सेवानिवृत्त झाल्याने श्री नारखेडे कार्यकारी अभियंता इ व द क्र २ याचे कडे अतिरिक्त कार्यभार देणे बाबत ३०/१२/२०१७ २८८
  सहाय्य्यक गट विकास अधिकारी रोहयो जिल्हा परिषद नाशिक या पदाचा कार्यभार श्री देसले सहा. गट विकास अधिकारी यांचेकडे अतिरिक्त देणे बाबत आदेश ०८/१२/२०१७ ५५६
  ५५ वर्ष वयाच्या पुढे सेवा चालू ठेवणेस पात्र ठरलेले वरिष्ठ/कनिष्ठ सहाय्यक लिपिक कर्मचारी यांचा आदेश ०४/१२/२०१७ २७०
  श्री. वनाजी आहेर, वाहन चालक यांचा बदली आदेश ०८/११/२०१७ ९३
  १) श्रीमती सीमा वानखेडे, वरिष्ट सहाय्यक लिपिक पंचायत समिती कळवण यांचा प्रतिनियुक्ती आदेश
  २) श्री विष्णू सहाणे, वरिष्ठ सहायक लिपिक पंचायत समिती सिन्नर विशेष वाहन भत्ता मंजुरी आदेश
  ३) श्री बाळू गवांदे , वरिष्ठ सहायक लिपिक पंचायत समिती सिन्नर विशेष वाहन भत्ता मंजुरी आदेश
  ०६/११/२०१७ ७८२
  जिल्हा समाजकल्याण अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री चौधरी उप मु. का. अ. (साप्रवि) यांना दिले बाबत १४/०९/२०१७ ३२२
  श्री. म्हसकर यांचे कडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) या पदाचा कार्यभार सुपूर्द करणे बाबत आदेश १८/०८/२०१७ ३०३
  जिल्हा नियोजन समिती निवडणूक २०१७ साठी तयार करण्यात आलेली अंतिम मतदार यादी. १६/०८/२०१७ १९२३
  तालुका संपर्क अधिकारी यांचा नियुक्ती आदेश ११/०८/२०१७ ४१५
  जिल्हा नियोजन समिती निवडणूक २०१७ साठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादी. ०७/०८/२०१७ ११३८
  श्री. परदेशी, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग क्रं. ३ ,जि.प. नाशिक याना प्रशासकीय बादलीने कार्यमुक्त आणि श्री. नारखेडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग क्रं. ३, जि.प. नाशिक येथे हजर झाले बाबत २०/०७/२०१७ ४१०
  प्रकल्प संचालक , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक यांचे कार्यभार बदला बाबत १४/०६/२०१७ ११०
  जिल्हा समाज कल्याण अधिकारी या पदाचा कार्यभार बदला बाबत १५/०६/२०१७ ८८
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  १/१/२०१९ रोजीची विस्तार अधिकारी (सांख्यीकी), ext.off.Statics सहाय्यक प्रशासन अधिकारी, so कनिष्ठ प्रशासन अधिकारी, os सहाय्यक प्रशासन अधिकारी (अपंग), so handicapped कनिष्ठ प्रशासन अधिकारी (अपंग) os handicapped प्रारुप सेवाजेष्ठता यादी २८/११/२०१८ ३४००
  १/१/२०१९ रोजीची परिचर सेवाजेष्ठता यादी २८/११/२०१८ १९००
  अनुकंपा अंतिम प्रतीक्षा यादी 2018 १३/१२/२०१८ ७०५६
  दिनांक ३१ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेम्बर २०२० या कालावधीत नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या वरिष्ठ सहाय्य्क लिपिक व कनिष्ट सहाय्यक लिपिक कर्मचाऱ्यांची यादी ०६/१२/२०१८ ६५७
  परिचर अंतिम सेवा जेष्ठता यादी ११/०९/२०१८ ५३२६
  अनुकंपा प्रतिक्षासूची प्रसिध्द माहे ऑगस्ट-18 अखेरची यादी ०१/०९/२०१८ ५९८८
  कनिष्ठ सहाय्यक लिपिक अंतिम सेवाजेष्ठता यादी सन २०१८ १०/०५/२०१८ १३३१
  वरिष्ठ सहाय्यक लिपिक अंतिम सेवाजेष्ठता यादी सन २०१८ १०/०५/२०१८ ११७०
  कनिष्ठ सहाय्यक लिपिक प्रारूप सेवाजेष्ठता यादी सन २०१८ ०८/०१/२०१८ २४६६९
  लघुलेखक (उच्च श्रेणी व कनिष्ठ श्रेणी ) प्रारूप सेवाजेष्ठता यादी सन २०१८ ०८/०१/२०१८ १७२२
  वरिष्ठ सहाय्यक लिपिक प्रारूप सेवाजेष्ठता यादी सन २०१८ ०८/०१/२०१८ १११८६
  कनिष्ठ सहाय्यक लिपिक अपंग कर्मचारी प्रारूप सेवाजेष्ठता यादी सन २०१८ ०८/०१/२०१८ २४२६
  वरिष्ठ सहाय्यक लिपिक अपंग कर्मचारी प्रारूप सेवाजेष्ठता यादी सन २०१८ ०८/०१/२०१८ २११९
  ०१ जानेवारी २०१८ रोजीची वाहन चालक यांची प्रारूप सेवा जेष्टता सूची ०३/१२/२०१७ ३१६
  अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची प्रारूप वास्तव जेष्ठता यादी ऑगस्ट २०१७ अखेर ०९/११/२०१७ १८६
  वाहन चालक यांची दि. ०१/०१/२०१७ रोजीची अंतिम सेवा जेष्टता यादी ०१/११/२०१७ ७०७
  दिनांक ०१/०१/२०१७ रोजीची परिचर पदाची शैक्षणिक अहर्ते नुसार अंतिम जेष्टता सूची ०१/११/२०१७ २७३५
  दिनांक ०१/०१/२०१७ रोजीची परिचर पदाची अंतिम अपंग जेष्टता यादी ०१/११/२०१७ २४२
  प्रारूप सेवा जेष्ठता सूची सन २०१७ - सन २०१७ ते २०१८ या कालावधीत सेवा निवृत्त होत असलेले वरिष्ठ / कनिष्ट सहाय्यक लिपिक जेष्ठता यादी ०७/०२/२०१७ १४३००
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  वरिष्ठ सहाय्यक लिपिक बदली २०१८ करीता वास्तव्य जेष्ठता सूची (आदिवासी क्षेत्र व बिगर आदिवासी क्षेत्र ) १६/०४/२०१८ १३९१
  कनिष्ठ सहाय्यक लिपिक बदली २०१८ करीता वास्तव्य जेष्ठता सूची (आदिवासी क्षेत्र व बिगर आदिवासी क्षेत्र ) १६/०४/२०१८ १४५०
  जिल्हा परिषद वर्ग-३,वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या-२०१८ ०३/०२/२०१८ १३१७
  श्री.बाळू पंडित शेवाळे.वाहनचालक बदली आदेश २४/०१/२०१८ ६८
  श्री प्रकाश आबाजी सोनावणे वाहन चालक बादलीने पदस्थापना आदेश २७-१२-२०१७ ३५४
  डॉ वैशाली दत्तात्रय झणकार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) या पदावर हजर दि १८/१२/२०१७ रोजी हजर २७-१२-२०१७ ३५४
  श्री सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता इ व द विभाग क्र १ जि प नाशिक या पदावर हजर झाले बाबत . १२/१२/२०१७ ३४२
  डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि प नाशिक या पदावर हजर झाले बाबत . १२/१२/२०१७ ३४०
  श्री रत्नाकर पगार, सहाय्यक गट विकास अधिकारी प. स. सिन्नर व श्री भारत धिवरे, सहाय्यक गट विकास अधिकारी रोहयो जि प नाशिक या पदावर पदस्थापना झालेने कार्यमुक्त करणे बाबत आदेश १२/१२/२०१७ ३०२
  श्री वसावे व श्री ठाकूर वाहन चालक यांचा बदली आदेश ०६/१२/२०१७ ४७९
  श्रीमती. वैशाली मारुती रसाळ गट विकास अधिकारी निफाड यांची सहाय्यक आयुक्त (तपासणी) विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे विनंती बदली झाल्याने कार्यमुक्त आदेश २४/११/२०१७ ४७९
  श्री. सुभाष वसावे वाहन चालक यांची बदली आदेश १०/११/२०१७ १०३
  श्री अन्सार अकबर शेख सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती येवला येथे बादलीने पदस्थापना १४/०९/२०१७ २८८
  श्री. रवींद्र देसले, सहायक गट विकास अधिकारी , पंचायत समिती देवळा येथे बादलीने पदस्थापना बाबत २०/०७/२०१७ ३६७
  बदलीने कार्यमुक्त आदेश - श्रीमती. भावना पी. राजनोर, शिक्षणाधिकारी (निरंतर),जिल्हा परिषद नाशिक या पदावरून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ,जिल्हा परिषद बीड २७/०७/२०१७ ४३८
  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदाचा कार्यभार दिनांक ०९/०७/२०१७ मध्यंहोनतर श्रीमती भावना राजनोर, शिक्षणाधिकारी (निरंतर) याना अतिरिक्त कार्यभार म्हणून सुपूर्द करण्यात येत आहे १०/०७/२०१७ २८०
  श्री. दिलीप रामेश्वर सोनकुसळे , सहा गट विकास अधिकारी , पंचायात समिती , येवला यांची बदलीने पदस्थापना सहा गट विकास अधिकारी , पंचायात समिती पेठ, जि. नाशिक या पदावर करण्यात आली आहे ०६/०७/२०१७ ११४
  श्रीमती. पुष्पा आर. पांडे , गट विकास अधिकारी, पंचायत समिती चांदवड ह्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने श्री. हिरामण मानकर याना गट विकास अधिकारी पंचायत समिती चांदवड या पदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. ०४/०७/२०१७ ५३१
  श्री.महेश उखाजी पाटील, उप मुख्य कार्यकरी अधिकारी, (पाणी पुरवठा व स्वच्छता) जिल्हा परिषद, वाशिम यांची गट विकास अधिकारी, पंचायत समिती देवळा, जि.नाशिक या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे २८/०६/२०१७ ८२
  श्री.डोंगरे महारु बहिरम, गट विकास अधिकारी, पंचायत समिती बागलाण ,जि. नाशिक पदावरून बदलीने पदस्थापना गट विकास अधिकारी, पंचायत समिती कळवण , जि. नाशिक या पदावर बदली करण्यात आलेली आहे २८/०६/२०१७ ८२
  श्रीमाती. अश्विनी सुरेश ठाकुर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती सिन्नर यांची गट विकास अधिकारी, पंचायत समिती उत्तर सोलापूर , जि. सोलापूर या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे २८/०६/२०१७ १०३
  श्री. जितेंद्र राजेद्न देवरे, गट विकास अधिकारी, यांचा रुजू होणेबाबतचा रिपोर्ट २२/०६/२०१७ ३६८
  बदली / पदस्थापना आदेश ( गट विकास अधिकारी / सहा. गट विकास अधिकारी ) ०६/०६/२०१५ २६१६
  संदर्भ क्र. १ च्या आदेशान्वये श्री. अजितसिंग गुलाबसिंग पवार , सहा. गात विकास अधिकारी , पंचायात समिती सुरगाणा जि. नाशिक या पदावरून प्रशासकीय बदलीने पदस्थापना सहा. गात विकास अधिकारी , पंचायात समिती चाळीसगाव जि. जळगांव या पदावर करण्यात आलेली आहे ०६/०६/२०१५ ३३५१
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत कंत्राटी विधी अधिकारी पदाकरिता जाहिरात २०/११/१८ ७६४०
  परिचर यांचे परिविक्षाधिन कालावधी आदेश ०५/११/१८ ५६९
  जिल्हा व तालुका पेसा समन्वयक निवड यादी प्रतिक्षा यादी तसेच एकत्रित गुणतक्ता १२/१०/१८ ७९८
  अपात्र यादीतील उमदेवारांनी घेतलेल्या आक्षेपांवर अभिप्राय ०६/१०/१८ ३३८
  तालुका पेसा समन्वयक पदाचे लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवार यादी ०६/१०/१८ ३४७
  जिल्हा पेसा समन्वयक पदाचे लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवार यादी ०६/१०/१८ ३४७
  राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान,जिल्हा पेसा समन्वयक कंत्राटी पात्र /अपात्र यादी २०१८ ०१/१०/१८ ८९५
  राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान,तालुका पेसा समन्वयक कंत्राटी पात्र /अपात्र यादी २०१८ ०१/१०/१८ ५११
  राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान,कंत्राटी पदभरती 2018- 1) संक्षीप्त जाहिरात 2) अर्जाचा नमुना १४/०९/१८ १३२८
  जिल्हा परिषद विधीतज्ञ नेमणुकी करीत करावयाचा अर्ज ( सन २०१७-१८ ते २०१९-२०२०) १७/११/१७ २८६
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  नाशिक ज़िल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरील सर्व माहिती अद्यावतीकरण करणे करीत देखभाल व दुरुस्ती करार करणे बाबत १८/०८/२०१८ २०२
  जिल्हा परिषद स्तरावर मध्यवर्ती ई-निविदा कक्ष (e-Tender Cell) स्थापन समिती व कर्मचारी आदेश. ०६/०२/२०१८ १४७५
  कॉम्पुटर व प्रिंटर खरेदीबाबत ई-निविदा-२०१७/१८ ०६/०२/२०१८ १३५४
  संगणक, बारकोड प्रिंटर व स्कॅनर खरेदी दरपत्रके दिनांक ०५/०१/२०१८ ते दिनांक ११/०१/२०१८ या कालावधीत स. १० ते साय. ५ वाजेपर्यंत मागविणे बाबत ०६/०१/२०१८ २६६
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  वरिष्ठ सहाय्यक लिपिक रिक्त पदे १७/०१/२०१८ २५
  कनिष्ठ सहाय्यक लिपिक रिक्त पदे १७/०१/२०१८ २५
  तालुका संपर्क अधिकारी म्हणून नेमून दिलेल्या तालुक्यास नियमित भेटी बाबत ०८/१२/२०१७ ५५६
  तालुका संपर्क अधिकारी म्हणून नेमून दिलेल्या तालुक्यास नियमित भेटी बाबत ०६/०६/२०१७ २८१६
  तालुका संपर्क अधिकारी म्हणून नेमून दिलेल्या तालुक्यास नियमित भेटी बाबत ३१/०५/२०१७ २५१
  तालुका संपर्क अधिकारी म्हणून नेमून दीलेल्या तालुक्यास भेटी देण्या बाबत १६/०५/२०१७ ५४४